आशियाई युवा अॅथलेटिक्स स्पर्धा आजपासून

वृत्तसंस्था/ दुबई

येथे बुधवारपासून 20 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करण्यासाठी भारतीय अॅथलिट्स सज्ज झाले आहेत. या स्पर्धेसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनने 60 जणांचा संघ निवडला आहे.

भारताचे अॅथलिट्स सिद्धार्थ चौधरी आणि महिला धावपटू लक्षिता सँडिलीया हे अनुक्रमे पुरूषांच्या गोळाफेक आणि महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत पुन्हा जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी प्रयत्न करतील. 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान पेरूतील लिमा येथे होणाऱ्या 20 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीची ही पात्र फेरीची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. 2023 साली कोरीयात झालेल्या आशियाई युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने 6 सुवर्णांसह एकूण 19 पदकांची कमाई केली होती. त्याचप्रमाणे भारताने 7 रौप्य आणि 6 कांस्यपदके मिळवित पदक तक्त्यात तिसरे स्थान पटकाविले होते. 2023 च्या स्पर्धेमध्ये जपान पहिल्या तर चीन दुसऱ्या स्थानावर होता. बुधवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय पथक अधिक पदकांची कमाई करेल, अशी आशा प्रमुख प्रशिक्षक एन. रमेश यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या 4×100 मी. रिले प्रकारात कांस्यपदक तर 4×400 मी. रिले प्रकारात भारताने रौप्यपदक मिळविले होते. यावेळी या दोन्ही रिले प्रकारात भारताला सुवर्णपदके मिळविण्याची संधी आहे.

भारतीय संघ – पुरूष : अभिराम प्रमोद, अमन चौधरी, अनुरागसिंग कलेर, बापी हंसदा, देवकुमार मिना, दिपांशु शर्मा, मृत्यम जयराम दोंडापती, गौरव भोसले, हर्षितकुमार, हिमांषु, हिमा तेजा विलापी, कार्तिकेयन सुंदरराजन, कुलदीपकुमार, महेंद्र एस., मोहम्मद साजिद, नवप्रीतसिंग, निखिल ढाके, प्रतिक, प्रियांशु, एस. राहुल, रणवीर अजय सिंग, रितीक, रोहन घोष, रोहन यादव, सचिन, साहिल मलिक, शहनवाज खान, शाहरुख खान, सिद्धार्थ चौधरी, विकासकुमार बिंद आणि विनोदसिंग.

महिला : आरती, अभिनया राजारंजन, अमनात कंबोज, अनुष्का यादव, अनुष्का कुंभार, साईसंगीता दोडला, एकता डे, जयाविंदीया जगदीश, कनिष्टाटिना शेखर, लक्षीता सँडिली, एम. काजला, नंदिनी, निओली अण्णा, निकिता कुमारी, पवना नागराज, प्राची देवकर, प्रतिक्षा अशोककुमार, ऋषिका अवस्थि, रुजुला भोसले, सविता टोपो, साक्षी चव्हाण, सँड्रेमोल साबू, शिल्पाबेन डिव्होरा, श्रेया राजेश, सिया सावंत, सुनिता देवी, तन्वी मलिक आणि उन्नती बोलँड.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;