राधिका आपटे हिची अवस्था पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्रीला नक्की झालंय तरी काय?

राधिका आपटे हिची अवस्था पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्रीला नक्की झालंय तरी काय?

बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री राधिका आपटे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री फक्त एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे.नेहमी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करणाऱ्या राधिकाचा असा फोटो पाहून चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. शिवाय राधिका हिची अवस्था अशी का झाली आहे… असा प्रश्न देखील चाहते विचारत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राधिका हिच्या फोटोची चर्चा रंगली आहे.

फोटोमध्ये राधिका नो-मेकअप लूकमध्ये दिसत असून अभिनेत्रीच्या नाकावर पट्टी दिसत आहे. शिवाय अभिनेत्रीने विस्कटलेले केस हातात घेतले आहेत. राधिका हिचा फोटो पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, अभिनेत्रीला नक्की झालंय तरी काय. राधिका हिचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Radhika (@radhikaofficial)

 

राधिका हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये तिच्या आगामी सिनेमाचा फर्स्टलूक असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे. ‘ती इकडेच आहे… जगात स्वागत उमा…, कान्स डायरेक्टर्स फोर्टनाईटला जाण्यापूर्वी सिस्टर मिडनाईटचा पहिला लूक…’ सांगायचं झालं तर, राधिकाचा फोटो ‘सिस्टर मिडनाईट’ सिनेमातील आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाला कान्स फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळालं आहे.

‘सिस्टर मिडनाईट’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक करण कंधारी यांनी केलं आहे. ‘सिस्टर मिडनाईट’ सिनेमाचा फेस्टिव्हलच्या डायरेक्टर्स फोर्टनाइटमध्ये प्रिमियर होणार आहे. सिनेमात राधिका आपटे हिच्यासोबत अभिनेता अशोक पाठक मुख्य भूमिकेत आहे. सर्वत्र ‘सिस्टर मिडनाईट’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

राधिका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देताना राधिका मागे-पुढे पाहत नाही. राधिका हिने अनेक मराठी आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

राधिका हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये, वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘पार्च्ड’, ‘रक्त चरित्र’, ‘रक्त चरित्र 2’, ‘शोर इन द सिटी’, ‘मांझी द माउंटमॅन’, ‘बदलापूर’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;