तब्बल 700 कारागिरांच्या टीमने तीन एकरमध्ये असा उभारला ‘हिरामंडी’चा भव्यदिव्य सेट
चित्रपटांद्वारे 'लार्जर दॅन लाइफ'चा अनुभव देणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लवकरच 'हिरामंडी' या सीरिजच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी'च्या ट्रेलरमध्ये भव्यदिव्य सेट्स, कलाकारांचे भरजरी कपडे, अत्यंत बारकाइने डिझाइन केलेली प्रत्येक गोष्ट पहायला मिळते.
"मला भव्यदिव्य जागेत हरवून जायला आवडतं" असं म्हणत भन्साळींनी त्यांच्या चित्रपटांमधील मोठ्या सेट्समागील कारण सांगितलं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'हिरामंडी' या आठ भागांच्या सीरिजसाठी त्यांनी तीन एकर जमिनीवर सेट उभारला होता.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भन्साळींनी सेटसाठी किती मेहनत घेतली, याविषयी सांगितलं. जवळपास 60 हजार लाकडी फळ्या आणि धातूच्या फ्रेम्सने सेट उभारण्यासाठी 700 कारागिरांच्या टीमने मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सात महिने काम केलं होतं.
ख्वाबगाह, भव्य मशीद, मोठं अंगण, नृत्यासाठीचा हॉल, पाण्याचे कारंजे, वसाहतीसारखी वाटणाऱ्या रुम्स, रस्ते, दुकानं, इतर लहान कोठे, हमाम खोली या सर्व गोष्टी सेटवर उभारण्यात आल्या आहेत.
"उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात, पण उत्कृष्टता कधीही साध्य केली जाऊ शकत नाही", असं भन्साळी म्हणतात. मुघल लघुचित्रे, भित्तीचित्रे, ब्रिटिश अधिकाऱ्यांची चित्रे, खिडकीच्या चौकटींवरील फिलीग्रीचे काम, फरशीवरील मुलामा चढवलेले नक्षीकाम, बारीक नक्षीकाम केलेले लाकडी दरवाजे, झुंबर हे सर्व भन्साळींच्या देखरेखीखाली हाताने बनवण्यात आले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List