मलेशियन नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर, 10 ठार
मलेशियामध्ये दोन नौदलाच्या हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर होऊन किमान 10 जणांचा मृत्यू झाला. लुमुट नौदल तळावर मंगळवारी सकाळी 9.32 वाजता ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर रॉयल मलेशियन नेव्ही परेडसाठी प्रशिक्षण कवायती करत असताना ही टक्कर झाली.
सोशल मीडियावरील व्हिडीओंमध्ये लुमुट नौदल तळावर टक्कर झाल्याचा क्षण कैद झाला आहे.
एका निवेदनात, नौदलानं अपघातात सहभागी विमानातील सर्व 10 क्रू सदस्यांच्या मृत्यूची पुष्टी केली, अशी बातमी रॉयटर्सने दिली.
‘सर्वांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्यासाठी लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले’, अशी माहिती नौदलानं दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List