बार्सिलोना स्पर्धेत स्पेनचा रूड विजेता
वृत्तसंस्था/ बार्सिलोना
एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या बार्सिलोना खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नॉर्वेच्या कास्पर रूडने एकेरीचे जेतेपद पटकाविताना ग्रीकच्या स्टिफॅनोस सित्सपेसचा पराभव सरळ सेट्समध्ये केला.
पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात रूडने सित्सपेसचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. गेल्या आठवड्यात झालेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत रूडला अंतिम सामन्यात सित्सपेसकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची परतफेड रूडने बार्सिलोना स्पर्धेत केली. 25 वर्षीय रूडच्या टेनिस कारकिर्दीतील एटीपी टूरवरील हे 11 वे विजेतेपद आहे. रूडने यापैकी 10 अजिंक्यपदे क्लेकोटवरील स्पर्धेत जिंकली आहेत. या पराभवामुळे सित्सपेसची सलग 10 सामन्यातील विजयी घोडदौड खंडीत झाली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List