आकाशदीप, प्रियांका पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र

वृत्तसंस्था/ अँटेलिया (तुर्की)

येथे सुरू असलेल्या विश्व अॅथलेटिक्स रेस चालण्याच्या सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेत मिश्र सांघिक रिले प्रकारात भारताच्या आकाशदीपसिंग आणि प्रियांका गोस्वामी यांनी 18 वे स्थान मिळवून पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट निश्चित केले. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी तुर्कीतील या स्पर्धेत आघाडीचे 22 संघ थेट पात्र ठरले असल्याने त्यामध्ये भारताचा समावेश झाला आहे. मिश्र सांघिक रिले प्रकारात आकाशदीप आणि प्रियांका गोस्वामी यांनी 42.195 कि. मी. अंतर तीन तास, 05 मिनिटे आणि 03 सेकंदात पार केले. आकाशदीप आणि प्रियांका यांची ही या क्रीडाप्रकारातील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.

मिश्र सांघिक रिले चालण्याच्या प्रकारामध्ये पुरूष आणि महिला स्पर्धकाचा समावेश असून पहिल्यांदा पुरूष स्पर्धकाला 12.195 कि. मी.चा टप्पा तर त्यानंतर महिला स्पर्धकांना 10 कि. मी.चा टप्पा चालत पार करावा लागतो. त्यानंतर पुरूष आणि महिला स्पर्धकाला प्रत्येकी पुन्हा 10 कि. मी.चे अंतर चालत पार करावे लागते. या क्रीडाप्रकारात इटलीच्या संघाने सुवर्णपदक मिळविताना दोन तास 56 मिनिटे आणि 45 सेकंदाचा अवधी घेतला. जपानने रौप्यपदक तर स्पेनने कास्यपदक मिळविले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;