भाजपने 10 वर्षांत कसे फसविले, रडविले याची आठवण ठेवा; राष्ट्रवादीचे प्रतीक पाटील यांचा हल्लाबोल

भाजपने 10 वर्षांत कसे फसविले, रडविले याची आठवण ठेवा; राष्ट्रवादीचे प्रतीक पाटील यांचा हल्लाबोल

लोकसभा निवडणूक तुमच्या-माझ्या अस्तित्वाची आणि देशाचे भवितव्य ठरविणारी आहे. गाफील राहू नका. सत्ताधारी भाजपाने गेल्या 10 वर्षांत आपल्याला कसे फसविले, रडविले, याची आठवण ठेवा. भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना संसदेत पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवानेते प्रतीक पाटील यांनी केले.

हातकणंगले लोकसभा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (आबा) यांच्या प्रचारार्थ वाळवा येथे झालेल्या सभेत प्रतीक पाटील बोलत होते. यावेळी राजेंद्र पाटील, नेताजीराव पाटील, प्रशांत थोरात, हर्षवर्धन पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, संग्राम जाधव, देवराज देशमुख, शिवसेनेचे शकील सय्यद, अलका राजे, योजना पाटील, मानव गवंडी, रंजना पवार, अनिता जंगम, फजल हवलदार उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सत्यजित पाटील (आबा) व प्रतीक पाटील यांचे तुतारीच्या निनादात जोरदार स्वागत केले.

प्रतीक पाटील म्हणाले, प्रत्येक कुटुंबाच्या खात्यावर 15 लाख रुपये टाकू, दरवर्षी देशातील 2 कोटी युवकांना नोकऱया देऊ, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करू, 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला पक्के घर देऊ, या भाजपाच्या आश्वासनांचे काय झाले? त्यांनी देशातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी किती उद्योग देशात आणले ते सांगावेत. भाजप नेत्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मोठी तफावत आहे, त्याला फसू नका, असे आवाहन त्यांनी केले.

सत्यजित पाटील (आबा) म्हणाले, माझ्या विजयात आपला मोठा वाटा असणार आहे. मीही तुम्हाला निराश करणार नाही. खासदारकीच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लावू.

यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक जयकर गावडे, राजेंद्र औंधकर, पै. किसन गावडे, जालिंदर थोरात, संदीप धनवडे, विकास अहीर, मीनाताई पाटील, वर्धमान मगदूम, मोहसीन लांडगे, प्रकाश मगदूम, अनिल थोरात, शेखरबापू शेळके उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;