Lok Sabha Election 2024 : विखेंच्या रॅलीत भाडोत्री गर्दी; नगरकरांना मनस्ताप

Lok Sabha Election 2024 : विखेंच्या रॅलीत भाडोत्री गर्दी; नगरकरांना मनस्ताप

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी आज काढलेल्या रॅलीमध्ये मोठय़ा प्रमाणात भोडोत्री गर्दी जमविण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नगरकरांनी संताप व्यक्त केला. या रॅलीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह नेतेमंडळींच्या ताफ्यासह शेकडो भाडोत्री गाडय़ा आणण्यात आल्यामुळे शहरातील रस्ते अनेक तास बंद ठेवण्यात आले होते. शहरात प्रचंड वाहतूककोंडी झाल्यामुळे नागरिकांना भरउन्हात ताटकळत राहावे लागले. ही रॅली मध्यवस्तीतून गेल्यामुळे येथील बँका, भाजी मार्केटसह दुकाने जबरस्तीने बंद करण्यात आली होती. तसेच एसटी बसेस स्थानकामध्ये अडकून पडल्यामुळे आणि बाहेरच्या बस शहरात येऊ न दिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एकंदरीत विखे यांचे अर्ज दाखल करण्यासाठीचे भाडोत्री शक्तिप्रदर्शन नगरकरांना मनस्ताप देणारे ठरले. दरम्यान, या रॅलीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारल्याची चर्चा सुरू होती.

महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत पदाधिकाऱयांपेक्षा जमविण्यात आलेल्या भाडोत्री गर्दीची चर्चा मोठय़ा प्रमाणात सुरू होती. गर्दी जमविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली होती.

रॅलीची सांगता होणारे ठिकाण मध्यवर्ती असल्यामुळे येथील राष्ट्रीय व सहकारी बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच गर्दीमुळे सर्वसामान्य नागरिकांना जाण्या-येण्यासाठी मार्गच नसल्यामुळे येथील भाजी मार्केटही बंद करण्यात आले होते. तसेच कार्यकर्त्यांनी येथील व्यापाऱयांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यामुळे सर्वसामान्य नगरकरांना हालअपेष्टा सहन करावी लागली.

भाडोत्रीचा व्हिडीओ व्हायरल

ह विखे यांनी रॅलीत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जमविण्यात आलेल्या गर्दीतील नागरिकांना पैसे दिले नसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. विखे यांच्या रॅलीसाठी प्रचंड गर्दी जमविण्याचे आदेश महायुतीतील पदाधिकाऱयांना देण्यात आले होते. गेल्या चार दिवसांपासून यंत्रणा कामाला लागली होती. या रॅलीसाठी जामगाव भागातून आलेल्या एका व्यक्तीने ‘आम्हाला 500 रुपये देतो, असे सांगितले होते. मात्र, 100 रुपयेसुद्धा दिले नाहीत,’ असा संताप व्यक्त केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे विखेंच्या रॅलीत भाडोत्री गर्दी जमविल्याचा पर्दाफाश झाला आहे.

प्रवाशांना बसला फटका

ह विखे यांच्या रॅलीमुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. विशेष म्हणजे ग्रामीण भागात एसटीने जाणारे प्रवासी बसस्थानकामध्येच अडकून पडले होते. गर्दीमुळे एकही एसटी शहरातून बाहेर आणि बाहेरून आत येऊ न शकल्याने प्रवाशांसह नागरिकांचे मोठे हाल झाले. तसेच परीक्षेसाठी जाणाऱया विद्यार्थ्यांचेही हाल झाले. एसटीची वाट पहात बसणाऱया नागरिकांमुळे बसस्थानकात मोठी गर्दी झाली होती.

सकाळी 9 ते सायंकाळी 5 मुख्य रस्ते बंद

ह महायुतीचे उमेदवार सुजय विखे अर्ज दाखल करताना पोलिसांनी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत शहरातील मुख्य रस्ते बंद केले होते. याबाबतचे आदेशच पोलिसांनी काढले होते. रस्ते बंद असल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;