Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांची उद्या सोलापुरात जाहीर सभा

Lok Sabha Election 2024 : राहुल गांधी यांची उद्या  सोलापुरात जाहीर सभा

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ठिकठिकाणी ‘इंडिया आघाडी’च्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बुधवारी (दि. 24) दुपारी जाहीर सभा होणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार काँगेसच्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार (दि. 24) दुपारी 3 वाजता शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे सभा होणार आहे, अशी माहिती निवडणूकप्रमुख प्रकाश यलगुलवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांची चुरशीची लढत होत आहे. प्रणिती शिंदे सध्या गावभेट दौरे करून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत, याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी नुकतेच काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील आणि अमित देशमुख यांच्या जाहीर सभा पार पडल्या. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची बुधवारी (दि. 24) जाहीर सभा होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;