तू आरोप कर मी क्लीन चिट देतो, पदही कायम ठेवतो! फडणवीसांनी परमवीर सिंहांना सांगितल्याचा अनिल देशमुख यांचा आरोप

तू आरोप कर मी क्लीन चिट देतो, पदही कायम ठेवतो! फडणवीसांनी परमवीर सिंहांना सांगितल्याचा अनिल देशमुख यांचा आरोप

आमचे लोक भाजपसोबत गेले कारण त्यांना ईडीची भीती होती. भाजपने फोडाफोडीचे राजकारण केले. मात्र, भाजपवाले अशा फोडाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचे प्रश्न विसरून गेले. परमवीर सिंह यांना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, तू अनिल देशमुख यांच्यावर आरोप कर. आम्ही तुला क्लीन चिट देऊ. त्यानंतर तुझे पदही तुला देऊ. त्यामुळे खोटया आरोपांमुळे माझ्यावर कारवाई झाली, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी भर प्रचारसभेत केला.

वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ आज सभा झाली. त्यावेळी त्यांनी हे गंभीर आरोप केले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते.

तर आपलं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही

जर आपण योग्य उमेदवाराला निवडून दिले नाही तर खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. दिल्ली ही देशाची राजधानी आहे त्याचा चेहरा मोहरा बदलण्याची कामगिरी ज्यांनी केली त्या केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले आहे. हुकूमशाही देशात पह्फावत आहे, जर योग्य वेळी याला थांबवलं नाही तर आपलं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;