परभणीत आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा
परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवार, 23 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या आक्रमक प्रचाराने परभणी जिल्हा ढवळून निघाला आहे. मंगळवार, 23 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता स्टेडियम मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही उपस्थिती राहणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List