ब्युटी पार्लरमध्ये छुपे कॅमेरे लावून ब्लॅकमेलिंग, आरोपीला अटक

ब्युटी पार्लरमध्ये छुपे कॅमेरे लावून ब्लॅकमेलिंग, आरोपीला अटक

ब्युटी पार्लरमध्ये छुपे कॅमेरे बसून आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला कोपरगाव येथून अटक करण्यात आली आहे. सुनील अर्जुन देवकर असं या आरोपीचं नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिलेने आपल्या ब्युटी पार्लरच्या व्यवसायासाठी देवकर याच्याकडून 5 लाख रुपये उसने घेतले होते. देवकर याने पीडितेच्या ब्युटी पार्लरमध्ये छुपे कॅमेरे बसवले होते. त्यात कैद झालेल्या आक्षेपार्ह फोटोंना व्हायरल करण्याची धमकी देऊन सुनील देवकर याने पीडितेला बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. ही घटना ऑगस्ट 2022 मध्ये घडली.

त्यानंतर वेळोवेळी त्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून पीडितेला जिवे मारण्याची धमकीही दिली होती. पीडितेने अखेर 20 एप्रिल 2024 रोजी सुनील देवकर विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देवकर विरुद्ध 376 (2) (N), 506 अन्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;