नवनीत राणा यांच्या पराभवामध्ये रवी राणा यांचा मोठा हातभार असेल, बच्चू कडूंची टीका

नवनीत राणा यांच्या पराभवामध्ये रवी राणा यांचा मोठा हातभार असेल, बच्चू कडूंची टीका

अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे उभे असून नवनीत राणा या भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. तर बच्चू कडू यांनी देखील प्रहारमधून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. नवनीत राणा यांचा पराभव झाला तर त्यात सर्वात मोठा हातभार रवी राणा यांचाच असेल, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवार दिनेश बुब यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेवर बच्चू कडू यांनी जोरदार प्रत्युत्तर केलं आहे. रवी राणा यांनी इतक्या खालच्या पातळीवर उतरून प्रचार करू नये. ज्यांचं खर मातीचं असतं त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत. आम्ही जर चित्रपटातील सीन काढले तर पिताना दिसतात. त्याचे समाज मनावर काय परिणाम होतात ते पाहिलं पाहिजे. रवी राणा यांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये. शेवटचे चार ते पाच दिवस राहिले आहेत. आम्ही जर खोलात हात टाकायला गेलो तर अडचण होईल, अशी टीका बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर केली.

नवनीत राणा यांन पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो रवी राणांचा आहे, त्यांची जी भाषा आहे आणि ते व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती, पण आता नवनीत राणा यांना निवडणुकीमध्ये पाडण्याचे श्रेय रवी राणा यांना जाईल, असा निशाणा बच्चू कडू यांनी साधला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;