एका अरेंज मॅरेजची गोष्ट.. असं जमलं मृणाल दुसानिसचं लग्न
माझिया प्रियाला प्रित कळेना, हे मन बावरे, तू तिथे मी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री मृणाल दुसानिसने करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं.
2016 मध्ये तिने अरेंज मॅरेज केलं आणि त्यानंतर ती पतीसोबत परदेशी स्थायिक झाली. आता लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर ती मायदेशी परतली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मृणालने तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे.
"माझ्या बाबांच्या ओळखीतल्या एका काकांनी आम्हाला नीरजचं स्थळ सुचवलं होतं. त्यानंतर एके दिवशी मला त्याचा फोन आला. आमचं एकमेकांशी बोलणं झालं. मग आम्ही भेटायचं ठरवलं होतं. आमचं अरेंज मॅरेज आहे", असं मृणालने सांगितलं.
"आई-बाबा जे स्थळ सुचवतील ते चांगलंच असणार याची मला खात्री होती. म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला. फोनवर बोलणं झाल्यानंतर तो अमेरिकेहून इथे भेटायला आला. त्यावेळी आम्ही बाहेर कुठे गेलो नाही. घरातच थोडा वेळ बोललो. त्यानंतर पुढचे सहा महिने आम्ही संपर्कात होतो", असं ती पुढे म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List