'खासदार नसतानाही वाहतूककोंडी च्या प्रश्नासाठी तीनदा नितीन गडकरींना भेटलो '; आढळराव पाटील

'खासदार नसतानाही वाहतूककोंडी च्या प्रश्नासाठी तीनदा नितीन गडकरींना भेटलो '; आढळराव पाटील

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी काल वाघोली दौरा केला. या दौऱ्यात आढळराव पाटलांनी नागरिकांच्या गाठीभेट घेत आपल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी वाघोलीमधील काही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आढळरावाचं जंगी स्वागत केले. त्यानंतर आढळरावांनी नागरिकांशी संवाद साधत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका केली. 

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी काल वाघोली दौरा केला. या दौऱ्यात आढळराव पाटलांनी नागरिकांच्या गाठीभेट घेत आपल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी वाघोलीमधील काही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आढळरावाचं जंगी स्वागत केले. त्यानंतर आढळरावांनी नागरिकांशी संवाद साधत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टिका केली. 

यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक धरणे आहेत. १० वर्षापुर्वी वाघोली जेव्हा छोटी होती तेव्हा येथील पाण्यासाठी मनपाने एक योजना आखली होती.  जीचा खर्च २५ कोटी होता. त्यापैकी निम्मा निधि मनपा देणार होती तर निम्मा खर्च वाघोली ग्रामपंचायतीला द्यावा लागणार होता. मी मंत्रालयात जाऊन यावर बोललो. मात्र खासदाराविना मतदारसंघ अशी मागच्या काही वर्षांपासून शिरुन मतदारसंघाची ओळख आहे. पुढे काय होणार ? असा टोलाही त्यांनी लगावला. 

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुणे शहरातील ड्रेनेजच्या समस्यांवर फक्त अजितदादा तोडगा काढू शकतात. त्याबाबत अजित पवार यांच्याकडे तशी विनंती केली आहे. याचबरोबर पुण्यातील ट्राफिकचा प्रश्न सोडविण्यासाठी खासदार नसतानाही तीनवेळी गडकरी यांची भेट घेतली आहे. असं म्हणत वाघोलीतील समस्या त्याचवेळी सुटतील जेव्हा लोकांनी लोकांत मिसळणारा उमेदवार निवडून दिला पाहिजे. असेही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, वाघोलीतील सवाना सोसायटीला आढळरावांनी भेट दिला. यावेळी राजकीय मतभेद विसरून तुमच्यासारखा सामाजिक जाण असणारा नेता ही निवडणुक लढतोय अशी भावना तेथील लोकांनी व्यक्त केली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना कोरोना पुर्वी रेल्वे सुट मिळत होती. ते सुरू करण्याची विनंती इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आढळरावांकडे करण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;