Lok Sabha Election 2024 : ना मतदान, ना मतमोजणी; निवडणुकीआधीच झाला खासदार

Lok Sabha Election 2024 : ना मतदान, ना मतमोजणी; निवडणुकीआधीच झाला खासदार

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. एकूण सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच गुजरातमध्ये निवडणुकीआधीच एक उमेदवार खासदारही झाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी ‘400 पार’चा नारा दिलेल्या भारतीय जनता पक्षाने मतमोजणीआधीच एक जागा जिंकली आहे. गुजरात राज्यामधील सूरत मतदारसंघात भाजप उमेदवाराने मतदान होण्याआधीच विजय मिळवला आहे. येथे भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

सूरत मतदारसंघात गेल्या दोन-तीन दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. रविवारी यावर सुनावणी पार पडली आणि काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला.

दरम्यान, या मतदारसंघातून 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. यादरम्यान बहुजन समाज पार्टीचे उमेदवार प्यारेलाल यांच्यासह 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला, तर काँग्रेस उमेदवाराचा अर्ज रद्द झाला. त्यामुळे येथे भाजप उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;