सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं गुजरात कनेक्शन, मोठी माहिती अखेर समोर

सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं गुजरात कनेक्शन, मोठी माहिती अखेर समोर

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कसून तपास करत आहे. या घटनेत वापरलेल्या दुचाकीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं प्रकरण सध्या तुफान चर्चेत आहे. याप्रकणी पुढील चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक टीम गुजरातमध्ये दाखल झाली आहे.ओरोपींनी गुन्हात वापरलेल्या पिस्तुलचा शोध घेण्यासाठी पोलीस गुजरात येथे पोहोचले आहेत.

आरोपींनी गुन्हात वापरलेली पिस्तुल गुजरात येथे फेकल्याची माहिती मिळत आहे. आरोपींनी तापी नदीमध्ये पिस्तुल फेकल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तापी नदी येथे पिस्तुलचा शोध सुरु असल्याची समोर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेचे युनिट -9 चे प्रमुख दया नायक सध्या गुजरातमध्ये दाखल झाले आहे.

गोळीबारा प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेत, त्यांची चौकशी सुरु केली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपीांनी गुजरातच्या दिशेने पलायन केलं. तेव्हा प्रवासात तापी नदीमध्ये आरोपींनी पिस्तुल फेकल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस देखील गुजरात येथे दाखल झाले आहेत. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. याठिकाणी स्थानिक पोलीस देखील उपस्थित आहेत.

आरोपीने पोलिसांना बंदूक सुरतच्या तापी नदीत फेकल्याचे सांगितले आहे. ज्यामुळे पोलिसांचे पथक सुरतमध्ये शोध घेत आहेत. चौकशीत आरोपींनी गुन्हा केल्यानंतर त्यांनी बंदूक सुरतच्या नदीत फेकल्याचे गुन्हे शाखेला सांगितले… आता या प्रकरणी पुढे काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गोळीबारानंतर आरोपींनी कसं केलं पलायन?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर, आरोपी वांद्रे येथील माउंट मेरी चर्च बाहेर पोहोचले. त्यांनी त्याठिकाणी बाईक सोडली आणि वांद्रे स्टेशनसाठी रिक्षा केली. त्यानंतर बोरिवली येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये दोघे पोहोचले. पण सांताक्रुज स्टेशनवर उतरले आणि पुढे गेले. या जागांवर असलेल्या सीटीटीव्ही फुटेजमुळे दोघांबद्दल माहिती समोर आली आहे…या घटनेच्या तपासासाठी अधिक पथके तयार करण्यात आली आहेत.

सांगायचं झालं तर, यापूर्वी देखील अनेकदा सलमान खान याला जीवेमारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अभिनेत्याला अनेकदा ईमेलमधून जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. यामुळे आता झालेल्या गोळीबारानंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;