अश्वत्थामा.. म्हणताच अंगावर काटा आणणारा टीझर; पहा ‘कल्की 2898 AD’चा व्हिडीओ

अश्वत्थामा.. म्हणताच अंगावर काटा आणणारा टीझर; पहा ‘कल्की 2898 AD’चा व्हिडीओ

साऊथ सुपरस्टार प्रभास, बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्या ‘कल्की 2898 AD’ या चित्रपटासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता व्यक्त केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन हे अश्वत्थामाची भूमिका साकारत आहेत. व्हिडीओमधील त्यांचा लूक अत्यंत जबरदस्त आहे. नाग अश्विन यांचा ‘कल्की 2898 एडी’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित प्रोजेक्ट आहे. रविवारी निर्मात्यांनी या चित्रपटातील बिग हींच्या भूमिकेवरून पडदा उचलला.

चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ हे एका गुहेसारख्या अंधाऱ्या जागी शिवलिंगासमोर बसून पूजा करताना दिसत आहेत. त्यानंतर एक लहान मुलगा त्यांना प्रश्न विचारतो की, “तुम्ही कोण आहात?” त्यावर ते म्हणतात, “प्राचीन काळापासून मी अवताराच्या आगमनाची प्रतीक्षा करतोय. मी गुरू द्रोण यांचा पुत्र आहे. अश्वत्थामा!” टीझरमधील सिनेमॅटोग्राफी, बिग बींचा लूक आणि त्यांचा आवाज अत्यंत दमदार आहे. अश्वत्थामाचा हा लूक पोस्ट करत बिग बींनी चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला. ‘हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत नवीन होता. अशा प्रोजेक्टचा विचार करण्याची मानसिकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सुपरस्टार्स असलेल्या सहकलाकारांचा सहवास.. हे सर्वकाही अभूतपूर्व होतं’, असं त्यांनी लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

एका पत्रकार परिषदेत नाग अश्विन यांनी चित्रपटाचं नाव ‘कल्की 2898 AD’ ठेवण्यामागचं कारण सांगितलं. “आमच्या चित्रपटाची कथा महाभारतापासून सुरू होते आणि 2896 मध्ये संपते. म्हणूनच चित्रपटाचं नाव तसं आहे”, असं ते म्हणाले. या चित्रपटाचं सध्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. येत्या 9 मे रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तब्बल 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट मानला जातोय. नाग अश्विन यांनीच चित्रपटाची कथा लिहिली असून त्याचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये प्रभास मुख्य भूमिका साकारतोय. त्यासोबत दीपिका पादुकोण महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन आणि दीपिका तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. याआधी ‘पिकू’ आणि ‘आरक्षण’ या चित्रपटांमध्ये दोघांची स्क्रीन शेअर केला होता. तर प्रभाससोबत पहिल्यांदाच दीपिकाची जोडी पहायला मिळणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;