‘अबोली’ अत्यंत रंजक वळणावर; कोर्टारुममध्ये पोहोचलं कथानक
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' या मालिकेत नवा अध्याय सुरू होतोय. कायद्याचं शिक्षण घेऊन वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीने पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वाला जातंय. मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी आता अबोली तिच्या बाजूने कोर्टात केस लढणार आहे.
अखेर मनवाला न्याय देण्यासाठी अबोलीने आव्हान स्वीकारलं आहे. प्रतापरावाच्या विरोधात आता अबोली मनवासाठी लढणार आहे. अबोलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी मालिकेतलं हे नवं वळण अनुभवण्यासाठी खूपच उत्सुक आहे.
याचसाठी केला होता अट्टहास अशी भावना तिने व्यक्त केली. वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List