शाहू महाराजांना ‘एमआयएम’चा पाठिंबा

शाहू महाराजांना ‘एमआयएम’चा पाठिंबा

सर्वसमावेशकता, बहुजनहिताय त्याचबरोबर लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या महाविकास आघाडीला विविध पक्ष आणि सामाजिक संघटना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना ‘एमआयएम’ पक्षाने आज पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आधीच कोल्हापुरातून भरभरून पाठिंबा मिळत असलेल्या शाहू महाराजांचे पारडे जड झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 19 एप्रिलला निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून, दुसरा टप्पा शुक्रवार, 26 एप्रिलला पार पडणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारची बहुजनहिताविरोधातली, लोकशाही आणि राज्यघटनेविरोधातली वाटचाल लक्षात घेऊन एमआयएमचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला.

आम्ही कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देत आहोत, असे यावेळी जलील यांनी स्पष्ट केले. कोल्हापुरातही मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे एमआयएमच्या पाठिंब्याने शाहू महाराजांची ताकद वाढणार आहे. कोल्हापूरच्या जागेसाठी महायुतीतील मिंधे गटाचे उमेदवार संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत.

वंचितचाही शाहू महाराजांना बिनशर्त पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीनेदेखील कोल्हापुरातून आपला उमेदवार उभा केलेला नाही. वंचितने या जागेवर शाहू महाराज छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दलित तसेच बहुजनांचाही पाठिंबा शाहू महाराजांना मिळण्याची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;