पाच वर्षांत खासदार संजय पाटील यांची संपत्ती 29 कोटी रुपयांनी वाढली

पाच वर्षांत खासदार संजय पाटील यांची संपत्ती 29 कोटी रुपयांनी वाढली

सांगली लोकसभा मतदारसंघात दोनवेळा निवडून आलेले आणि तिसऱयांदा मैदानात उतरलेले भाजपाचे खासदार संजय पाटील यांच्या मालमत्तेत मागील पाच वर्षांच्या तुलनेत 29 कोटी रुपयांची भर पडल्याचे दिसून येते. त्यांच्या नावावर स्थावर आणि जंगम मालमत्ता 48 कोटी 31 लाख 39 हजार रुपये इतकी आहे. खासदार पाटील यांच्यापेक्षा पत्नीची जंगम मालमत्ता तब्बल 30 कोटी 50 लाखांनी अधिक आहे. पत्नी ज्योती यांनी जंगम मालमत्तेपैकी 32 कोटी 31 लाख रुपये असुरक्षित कर्ज म्हणून एसजीझेड ऍण्ड एसजीए शुगर कंपनी तुरचीला दिले आहे.

सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी 2019च्या निवडणुकीत त्यांची मालमत्ता 19 कोटी 11 लाख 92 हजार रुपये इतकी असल्याचे नमूद केले होते, तर तेव्हा 2 कोटी 33 लाख रुपये कर्ज असल्याचे जाहीर केले होते.

तिसऱयांदा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना खासदार पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात जंगम मालमत्ता 2 कोटी 48 लाख 45 हजार रुपये असल्याचे जाहीर केले आहे. तर, स्थावर मालमत्ता 45 कोटी 82 लाख 93 हजार रुपये इतकी आहे. उत्पन्नाचा स्रोत शेती आणि व्यवसाय असा उल्लेख आहे. बँका व वित्तीय संस्थांकडील कर्ज 53 कोटी 2 लाख 52 हजार रुपये इतके आहे. प्रतिज्ञापत्रातील आकडेवारीनुसार, मागील पाच वर्षांच्या तुलनेत मालमत्तेमध्ये 29 कोटी रुपयांची भर पडल्याचे दिसून येते. तसेच कर्जाचा आकडाही 51 कोटी रुपयांनी वाढला आहे.

संजय पाटील यांच्याकडे गाडीच नाही

खासदार संजय पाटील यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे दहा लाखांचे सोने, तर पत्नीकडे 24 लाखांचे सोने आहे. दरम्यान, 2005 मध्ये मनाई आदेश असताना बेकायदा सभा घेतल्याबद्दल खासदार संजय पाटील यांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;