तिरुपती बालाजीच्या चरणी 11 टन सोनं अन् 18 हजार कोटी
तिरुपती येथील बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी जगभरातून लाखो भाविक येतात आणि भरभरून दान देतात. सर्व दान स्वरूपातील बाबींची जबाबदारी तिरुमाला तिरुपती देवस्थानम ट्रस्ट पाहते. तिरुपती बालाजी मंदिराच्या संपत्तीत यावर्षी मोठी वाढ झाली आहे.
अहवालानुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानाने यावर्षी 1161 कोटी रुपयांची एफडी केली आहे. बँकांमध्ये जमा केलेली एकूण एफडी 13 हजार 287 कोटींवर पोहोचली आहे. एप्रिल 2024 पर्यंत, तिरुपती ट्रस्टची बँका आणि त्याच्या विविध ट्रस्टमधील रोकड 18 हजार 817 कोटींवर पोहोचली आहे, जी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक आहे.
वर्षाला मिळतात 1600 कोटी
एकीकडे, तिरुपती ट्रस्टला त्याच्या एफडीवर व्याज म्हणून वार्षिक 1600 कोटी रुपयांची मोठी रक्कम मिळते. दुसरीकडे, ट्रस्टने नुकतेच 1031 किलो सोने जमा केल्यानंतर आता ट्रस्टचे 11329 किलो सोनेही बँकांमध्ये जमा झाले आहे.
बारा वर्षांत जमा रक्कम वेगाने वाढली
हे देशातील एकमेव हिंदू धार्मिक ट्रस्ट आहे, जे गेल्या 12 वर्षांत वर्षानुवर्षे 500 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करून वेगाने वाढत आहे. जगभरातून मोठय़ा प्रमाणावर भाविकांकडून तिरूपती देवस्थानाला दान मिळते. याआधी, केवळ तीन प्रकरणांमध्ये या मंदिराचा प्रसाद 500 कोटी रुपयांपेक्षा कमी होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List