गोरेगावचा हायफाय प्रोजेक्ट ठरणार म्हाडाचे ‘ड्रीम मॉडेल’

गोरेगावचा हायफाय प्रोजेक्ट ठरणार म्हाडाचे ‘ड्रीम मॉडेल’

>> मंगेश दराडे

परवडणारी घरे बांधण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या म्हाडाने आता खासगी विकासकांना टक्कर देत गोरेगावमध्ये स्वीमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्किंग अशा हायफाय सुविधा असणाऱ्या आलिशान घरांचा प्रकल्प उभारला आहे. या पहिल्यावहिल्या ‘ड्रीम मॉडेल’ला उच्च आणि मध्यम गटातील अर्जदारांकडून कसा प्रतिसाद मिळतोय यावरच पुन्हा अशा आलिशान घरांची निर्मिती करायची की नाही, याबाबतचा निर्णय प्राधिकरण घेणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

म्हाडातर्फे गोरेगावच्या प्रेमनगर येथे 39 मजली टॉवर उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून आतापर्यंत या टॉवरच्या 29 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. यात मध्यम उत्पन्न गटासाठी 227 तर उच्च उत्पन्न गटासाठी 105 फ्लॅट आहेत. उच्च उत्पन्न गटातील फ्लॅट 979 चौरस फुटांचे तर मध्यम उत्पन्न गटातील फ्लॅट 794 चौरस फुटांचे आहेत. सुरुवातीला मार्च 2025 पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे म्हाडाचे टार्गेट होते. कामाने पकडलेला वेग पाहता वर्षअखेरीस टॉवरचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत ज्या इमारतीला ओसी मिळू शकेल तेथील घरांचा समावेश जून-जुलैतील लॉटरीमध्ये समाविष्ट करण्याचा हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे या आलिशान घरांसाठी आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

किमतीबाबत लवकरच निर्णय

गोरेगावातील म्हाडाच्या आलिशान घरांच्या किमती काय असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अनेक सुखसोयींनी सुसज्ज असलेल्या म्हाडाच्या या घरांची स्पर्धा थेट खासगी विकासकांसोबत असली तरी त्यांच्या तुलनेत म्हाडाच्या या घरांच्या किमती नक्कीच कमी असतील. लवकरच प्राधिकरणाच्या बैठकीत या घरांच्या किमती ठरवल्या जातील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;