नापोलीचा पराभव
वृत्तसंस्था/ रोम
सिरी ए फुटबॉल स्पर्धेतील जेतेपद मिळविण्याच्या नापोलीच्या आशेला पराभवामुळे धक्का बसला आहे. शनिवारी येथे झालेल्या सामन्यात इम्पोलीने नापोलीचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या पराभवामुळे नापोली संघ स्पर्धेच्या गुणतक्त्यात 8 व्या स्थानावर आहे.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंटर मिलानचा संघ आघाडीवर असून नापोली संघ इंटर मिलानपेक्षा 34 गुणांनी पिछाडीवर आहे. शनिवारच्या सामन्यात इम्पोलीतर्फे एकमेव गोल अल्बर्टो सेरीने चौथ्या मिनिटाला हेडरद्वारे नोंदविला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List