मँचेस्टर सिटी अंतिम फेरीत

वृत्तसंस्था/ लंडन

बर्नार्डो सिल्व्हाच्या एकमेव निर्णायक गोलाच्या जोरावर शनिवारी विम्ब्लेच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीने चेल्सीचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत एफए चषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात 25 मे रोजी खेळविली जाणार आहे.

या सामन्यामध्ये मँचेस्टर सिटीतर्फे एकमेव निर्णायक गोल पोर्तुगालच्या बर्नार्डो सिल्व्हाने 84 व्या मिनिटाला नोंदविला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटीला जेतेपद मिळविण्याची संधी रियल माद्रीदकडून संपुष्टात आली होती. मँचेस्टर सिटीचा या स्पर्धेतील आणखी एक सामना कोव्हेंट्रीशी होणार आहे.

या स्पर्धेतील अन्य एका तळाच्या स्थानासाठीच्या सामन्यात बर्नेलीने शेफील्ड युनायटेडचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे या लीग स्पर्धेत बर्नेलीने 7 पैकी केवळ एकमेव सामना यावेळी गमाविला आहे. त्यांचे या स्पर्धेतील अद्याप 5 सामने बाकी आहेत. लुटॉन संघाला ब्रेंटफोर्डने 5-1 असे पराभूत केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;