आरोपीने स्वतःवर ब्लेड ने केले सपासप वार 

आरोपीने स्वतःवर ब्लेड ने केले सपासप वार 

चोरीच्या गुह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर जेलमध्ये नेत असताना आरोपीने स्वतःवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना माझगाव न्यायालय परिसरात घडली. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी मोहंमद गौस पठाण विरोधात गुन्हा नोंद केला.

काळाचौकी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुह्यात पोलिसांनी मोहंमद पठाणला अटक केली होती.

त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत होती. त्यामुळे त्याला माझगाव येथील न्यायालयात हजर केले होते. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर सायंकाळी पठाणला आर्थर रोड येथील तुरुंगात नेले जात होते. पोलिसांच्या पथकाने पठाणला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने न्यायालय परिसरात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलीस व्हॅनमध्ये बसण्यास पठाणने नकार दिला. मला सोडून द्या नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच त्याने तोंडातून ब्लेड काढून स्वतःवर ब्लेडने हल्ला केला. ब्लेडने हल्ला केल्यावर त्याला जे. जे. रुग्णालयात दाखल केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;