सुमित नागलचा खार जिमखान्याच्या वतीने गौरव
हिंदुस्थानचा अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू सुमित नागलने नुकतेच जागतिक टेनिस क्रमवारीत 80व्या स्थानावर धडक मारली आणि त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल खार जिमखान्याने घेतली आहे. त्यांनी नागलला खार जिमखान्याचे मानद सदस्यत्व बहाल करत त्याचा विशेष गौरव करण्यात आला.
गेल्याच वर्षी सुमित नागलची टेनिस विश्वातील अप्रतिम कामगिरी पाहून त्याला खार जिमखान्याचे त्याचा सन्मान करण्याचे निश्चित केले होते आणि ते आज केलेही. या गौरवक्षणी बोलताना सुमितने खार जिमखान्याच्या टेनिस कोर्टवर हिंदुस्थानचा स्टार टेनिसपटू महेश भूपतीसह केलेल्या सरावाच्या आठवणींना उजाळा दिला. जागतिक टेनिस क्रमवारीत आपण 80 व्या स्थानावर जाणे हा आपल्या कारकीर्दीतील एक टप्पा असून या वर्षीच अधिक मेहनत करून किमान पहिल्या 50 क्रमांकात स्थान मिळविणे हे आपले लक्ष्य असल्याचे त्याने सांगितले. 26 वर्षीय सुमित सध्या 1 ते 14 जुलैदरम्यान होणाऱया विम्बल्डन स्पर्धेवर लक्ष्य पेंद्रित करीत असून या स्पर्धेसाठी तो जोरदार सराव करीत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List