मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरील प्रवासाचा वेग वाढणार

मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरील प्रवासाचा वेग वाढणार

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात ताशी 50 किमी वेगमर्यादेत वाढ करून ताशी 60 अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी दोन दिवसांपासून सुरू झाली असून यामुळे महामार्गावरील प्रवासाचा वेग वाढणार आहे.

मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग 94 किमीचा असून या महामार्गावर प्रवास करताना हलक्या वाहनांना समतल भागात ताशी 100 किमी अशी वेगमर्यादा होती, तर 35 ते 52 किमीच्या बोरघाटात ताशी 50 किमी अशी वेगमर्यादा होती. अशावेळी समतल भागातून ताशी 100 किमी वेगाने येणाऱया वाहनांना बोरघाटात येताना ताशी 50 किमी वेग करणे अडचणींचे ठरत होते. त्यामुळे अपघातही होत होते. ही बाब लक्षात घेता पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र यांनी एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार बोरघाटातील वेगमर्यादा बदलण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. या प्रस्तावाच्या अनुषंगाने 15 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), परिवहन विभाग, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र आणि इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱयांची एक बैठक झाली. या बैठकीत एकमताने बोरघाटातील वेगमर्यादा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता महामार्गावर हलक्या वाहनांना समतल भागात ताशी 100 किमी तर बोरघाटात ताशी 60 किमी अशी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून ही नवीन वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;