मोदींची हवा टाईट झाली आहे
काँग्रेसवर आरोप करत मुस्लिमद्वेष पसरवणारे मोदी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ‘निराशा’ झाल्यामुळे आता खोटे बोलू लागले आहेत, लोकांचे लक्ष विचलित करत आहेत, त्यांची हवा टाईट झाली आहे, अशी टीका काँग्रेसने आज केली.
राजस्थानच्या बांसवाडा येथे एका सभेला संबोधित करताना, मोदींनी लोकांच्या कष्टाने कमावलेले पैसे आणि मौल्यवान वस्तू ‘घुसखोर’ आणि ‘ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना’ देण्याची काँग्रेसची योजना असल्याचा आरोप केला. पंतप्रधानांवर प्रत्युत्तर देताना, काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ‘निराशेला’ सामोरे गेल्यानंतर, नरेंद्र मोदींच्या खोटेपणाची पातळी इतकी घसरली आहे की त्यांना आता जनतेचे लक्ष खऱया प्रश्नांपासून इतरत्र वळवायचे आहे. पण आता लोक शहाणे झाले आहेत. ते या भूलथापांना बळी पडणार नाहीत.
मोदी सरकार हटवा, रेल्वे वाचवा
हिंदुस्थानी रेल्वेला मित्रांना विकण्यासाठी निमित्त मिळावे यासाठी भाजपप्रणित केंद्र सरकारचे रेल्वेला अकार्यक्षम ठरवायचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. सर्वसामान्यांची ही वाहतूक व्यवस्था वाचवण्यासाठी मोदी सरकारला सत्तेवरून हटवण्याचे आवाहन त्यांनी एक्स वरून केले. रेल्वेच्या डब्यात टॉयलेट आणि जमीनीवर बसून लोक प्रवास करत असल्याचा एक व्हीडीओ शेअर करत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List