महाराष्ट्रावर दुहेरी संकट; धरणांमध्ये फक्त 30 टक्के पाणी वीजटंचाईचेही चटके

महाराष्ट्रावर दुहेरी संकट; धरणांमध्ये फक्त 30 टक्के पाणी वीजटंचाईचेही चटके

उष्णतेच्या लाटेमुळे एकीकडे राज्यातल्या सर्व धरणांतील पाणीसाठा सरासरी 30 टक्क्यांवर आला आहे तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी कमालीची वाढली आहे. या सर्वांचा परिणाम कोयना धरण जलविद्युत पेंद्रावर झाला आहे. सध्या कोयना धरणातील पाणीसाठा 37 टक्क्यांवर आला आहे. पाणी परिस्थिती बिघडून राज्यात सुका दुष्काळ आणि विजेचा दुष्काळ असे दुहेरी संकट राज्यापुढे घोंघावत आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण पुढच्या दोन महिन्यांत तळ गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोयना धरण जल विद्युत पेंद्रावर यंदा पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. कोयना धरण क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावत आहे.

राज्याच्या विजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्यास कोळशावरील वीज प्रकल्पातून तत्काळ वीजनिर्मिती वाढवता येत नाही,

तेव्हा जलविद्युत प्रकल्पातून तत्काळ वीजनिर्मिती सुरू करून ग्रीडची स्थिरता राखली जाते, मात्र पुढील काळात कोयना धरणातच पाण्याचा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात अचानक विजेची मागणी वाढल्यास तत्काळ वीजनिर्मिती वाढवताना मर्यादा येणार आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडण्याची भीती वर्तवण्यात येते.

वीज निर्मितीचे संकट

 कोयना धरणाची वीजनिर्मिती क्षमता सुमारे 1 हजार 960 मेगावॉट एवढी आहे. त्यामधून विजेच्या मागणीनुसार 1 हजार 900 मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती करता येते, मात्र यंदा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची कमी नोंद झाल्याने वीजनिर्मितीसमोर संकट उभे राहू शकते असे सांगण्यात येते.

राज्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा

पैठण (जायकवाडी) ः 12.94 टक्के

भंडारदरा ः 38.3 टक्के

गंगापूर (नाशिक) ः 44.8 टक्के

पानशेत (पुणे) ः 31.31 टक्के

नीरा देवघर (पुणे) ः 26.22 टक्के

खडकवासला(पुणे) ः 54.95 टक्के

कोयना (सातारा) ः  37.76 टक्के

तिल्लारी (सिंधुदुर्ग) ः 40.74 टक्के

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणातील पाणीसाठा

भातसा      39.81 टक्के

मोडकसागर     45.65 टक्के

तानसा      48.43 टक्के

वैतरणा      48.29 टक्के

मध्य वैतरणा    9.41  टक्के

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;