मराठ्यांनो, राजकारण्यांच्या नादी लागू नका – जरांगे पाटील

मराठ्यांनो, राजकारण्यांच्या नादी लागू नका – जरांगे पाटील

मराठ्यांनो, राजकारण्याच्या नादाला लागून आपल्या जीवनाचे वाटोळे करून घेऊनका, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. पूर्णा तालुक्यातील गौर येथे संवाद बैठकीत ते बोलत होते.

ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठीच्या संघर्षास मराठ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद ऐतिहासिक राहिला. मराठा समाज त्यातून एक झाला, ती एकजूट आता महत्त्वाची आहे. आरक्षणासाठी सगेसोयर्‍याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याकरिता निर्णायक लढाईची गरज आहे. तो लढा आपण सर्वजण एकमुखाने लढू, आपल्याविरुद्ध अनेक षड्यंत्र झाले. परंतु, आपण ते हाणून पाडले. आपण कधीही मागे हटलो नाही. मरेपर्यंत हटणारही नाही, असेही ते म्हणाले.

8 जून रोजी बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे सभा होणार आहे. त्यासाठी 900 एकर जमिनीवर सभेच्या दृष्टीने सर्वतोपरी नियोजन केले जाणार आहे. मराठाबांधवांची ही सभा रेकॉर्डब्रेक व ऐतिहासिक व्हावी या दृष्टिकोनातून सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मराठाबांधवांनी सतर्क रहावे, जागरूक रहावे, सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणीही शांत बसू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने जरांगे यांचे पूर्णा शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. पूर्णा टी पॉइंट, देवगाव फाटा, एरंडेश्वर, कात्नेश्वर, माटेगाव तसेच नांदेड रस्त्यावरील चुडावा भागातही त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले. ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणांनी संवाद सभास्थान व स्वागत स्थान दुमदुमले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;