वडिलांच्या संपत्तीचा एकही रुपया सुष्मिता सेनला मिळणार नाही; काय आहे कारण?
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या खासगी आयुष्यात अत्यंत कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत. मात्र या निर्णयांचा काही परिणामसुद्धा त्यांना भोगावा लागला. यात अभिनेत्री सुष्मिता सेनचंही नाव आघाडीवर आहे. सुष्मिताने तिच्या आयुष्यात असेही काही निर्णय घेतले आहेत, ज्यामुळे तिला तिच्या कुटुंबीयांकडून आणि समाजाकडूनही विरोध झाला.
सुष्मिताचा हा निर्णय म्हणजे लग्न न करता मुलींना दत्तक घेणं. याच मोठ्या निर्णयामुळे तिला वडिलांच्या संपत्तीतून एकही रुपया मिळणार नाही. खुद्द सुष्मिताने याविषयीचा खुलासा केला होता.
याविषयी सुष्मिताने सांगितलं, "मी जेव्हा अनाथाश्रमांना भेट द्यायची, तेव्हा मला जाणवलं की बऱ्याच निराधार मुलांना आईची आणि प्रेमाची गरज आहे. त्याचवेळी मी मूल दत्तक घ्यायचं ठरवलं होतं. पण माझा हा निर्णय अनेकांना मान्य नव्हता. माझी आई माझ्यावर चिडली होती."
"तू लग्नानंतरही मूल दत्तक घेऊ शकतेस, असा सल्ला अनेकांनी दिला होता. माझे वडीलसुद्धा मला असंच म्हणाले होते. तेव्हा मी त्यांना विचारलं की, जर माझं लग्न झालं आणि माझ्या पार्टनरने या निर्णयाला नकार दिला तर काय करू? मला कोणालाच उत्तर द्यायचं नाही. त्यानंतर त्यांनी माझ्या निर्णयाला पाठिंबा दिला," असं सुष्मिताने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List