शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न करण्यापूर्वीच दीपिका कक्कर हिने स्वीकारला होता इस्लाम?, मोठा खुलासा करत अभिनेत्री..

शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न करण्यापूर्वीच दीपिका कक्कर हिने स्वीकारला होता इस्लाम?, मोठा खुलासा करत अभिनेत्री..

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. दीपिका कक्कर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दीपिका कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून मालिकांपासून दूर आहे. मात्र, असे असतानाही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. दीपिका कक्कर हिच्या शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय चाहत्यांसाठी नक्कीच हैराण करणारा होता. हेच नाही तर लग्नानंतर दीपिका कक्कर हिने इस्लाम धर्म देखील स्वीकारला. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली.

आता नुकताच दीपिका कक्कर हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे दीपिका कक्कर हिने केले आहेत. काही लोकांचे म्हणणे होते की, दीपिका कक्कर हिने लग्नानंतर इस्लाम स्वीकारला नाही तर काही लोकांचे म्हणणे आहे की, दीपिका कक्कर हिने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. आता पहिल्यांदाच त्यावरच बोलताना दीपिका कक्कर ही दिसलीये.

दीपिका कक्कर म्हणाली की, होय मी इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मात्र, मी इस्लाम का स्वीकारला आणि कधी स्वीकारला हे सांगणार नाही. कारण हे माझे एकदम खाजगी आहे. मला वाटत नाही की, मी याबद्दल मीडियासमोर बोलले पाहिजे. हे माझे खूप खासगी असून मला यावर खुलेपणाने बोलायचे नाहीये.

हेच नाही तर इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर दीपिका कक्कर हिचे नाव देखील बदलले असून फायजा हे दीपिका कक्करचे नाव आहे. दीपिका कक्कर हिचे शोएब इब्राहिमसोबतचे हे दुसरे लग्न आहे. दीपिका कक्कर हिचे अगोदर एक लग्न झाले आहे. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांची लव्ह स्टोरी मालिकेच्या सेटवर सुरू झाली. एका शोमध्ये दीपिकाला शोएबने प्रपोज केला.

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांना आता एक मुलगा देखील आहे. नेहमीच आपल्या पर्सनल लाईफबद्दल मोठे खुलासे करताना दीपिका कक्कर ही दिसते. दीपिका कक्कर ही ब्लाॅगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या देखील संपर्कात असते. प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना देखील दीपिका कक्कर ही दिसते. दीपिका कक्कर हिने हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. दीपिका कक्कर ब्लाॅगमध्ये विविध पदार्थ बनवताना देखील दिसते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;