जीव तर जाणार नाही ना..; सैफशी लग्न न करण्याचा सल्ला देणाऱ्यांना करीनाचं असं होतं उत्तर
बॉलिवूड इंडस्ट्रीत जेव्हा अभिनेत्री यशाच्या शिखरावर असतात, तेव्हा त्यांना लग्नापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर उद्ध्वस्त होतं, असं म्हटलं जातं. अभिनेत्री करीना कपूरने सैफ अली खानशी 2012 मध्ये लग्न केलं होतं. तेव्हा तिलासुद्धा सैफशी लग्न न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
करीनाने लग्नाच्या काही वर्षांनंतर याबद्दलचा खुलासा केला होता. 2020 मध्ये 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत करीना सैफसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. सैफसोबत अधिकाधिक वेळ घालवता यावा यासाठी तिने लिव्ह-इन रिलेशनशिपचा निर्णय घेतला होता. लिव्ह-इनमध्ये राहताना सैफने तिला लग्नासाठी विचारलं होतं.
त्यावेळी अनेकांनी सैफशी लग्न करू नकोस, तुझं करिअर उद्ध्वस्त होईल, असा सल्ला अनेकांनी दिल्याचं करीनाने सांगितलं. त्यांना करीना म्हणाली, "करिअरच संपेल ना? आयुष्य तर नाही संपणार. मी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याच्याशी लग्न केल्याने जर निर्मात्यांना माझ्यासोबत काम करायचं नसेल तर ठीक आहे."
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List