निक जोनाससोबत ‘या’ 166 कोटींच्या बंगल्यात राहायला जाणार प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे लवकरच त्यांच्या लॉस एंजिलिसमधल्या नूतनीकरण केलेल्या घरात राहायला जाणार आहेत. त्यांच्या या भव्यदिव्य घराची किंमत तब्बल 20 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 166 कोटी रुपयांहून अधिक आहे.
2018 मध्ये लग्न केल्यानंतर प्रियांका निकसोबत लॉस एंजिलिसमध्ये स्थायिक झाली. 'द हॉलिवूड हिल्स मॅन्शन'मध्ये हे दोघं त्यांची मुलगी मालती मेरीसोबत राहतात. या घराचं बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात आलं असून त्याचे काही फोटो समोर आले आहेत.
प्रियांका-निकचं हे घर राहण्यालायक राहिलेलं नव्हतं, म्हणून ते काही महिन्यांपूर्वी दुसरीकडे राहायला गेले होते. घरात ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने बुरशीचा प्रादुर्भाव झाला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी घराच्या विक्रेत्याविरोधात कायदेशीर तक्रारसुद्धा केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List