भाजपच्या मुंबईतील मुख्यालयाला आग
भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंट येथील कार्यालयाला आग लागली आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रं आणि प्रचाराचं साहित्य असल्याने ते आगीमध्ये जळाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजप कार्यालयात वेल्डिंगचे काम करण्यात येत होते. या कामादरम्यान कार्यालयातील स्वयंपाक घरात शॉर्ट सर्किंट झाले व आग लागल्याचे समजते. या ठिकाणी धुराचे मोठे लोट दिसून आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List