रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांची शासकीय रुग्णालयाला भेट; अचानक केली पहाणी
लोकसभा निवडणूकीच्या कामकाजात व्यस्त असताना रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवारी रात्री 9.30 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर तेथील व्यवस्थापनाबाबतही त्यांनी माहिती घेतली. जिल्हा शासकीय रूग्णालयात अनेक गैरसोयी आहेत. डॉक्टर नसल्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा रूग्णालयात फिजिशीयन, भूलतज्ञ तसेच अनेक डॉक्टर उपलब्ध नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या या भेटीला महत्व आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List