राहुल गांधींची तब्येत बिघडली, रांचीतील ‘इंडिया’ आघाडीच्या सभेला राहणार अनुपस्थित; MP दौराही रद्द
लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ते रविवारी झारखंडमधील रांची येथे होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत. एवढेच नाही तर त्यांचा मध्य प्रदेश दौराही रद्द झाला आहे. मध्य प्रदेशमधील सतना येथे ते जाहीर सभेला संबोधित करणार होते. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
राहुल गांधी रविवारी सतना आणि रांची येथे निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज होते. येथे ‘इंडिया’ आघाडीच्या सभा होणार आहेत. मात्र अचानक त्यांची तब्येत बिघडली असून ते सध्या दिल्लीबाहेर जाऊ शकत नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सतना येथील सभेला संबोधित करतील आणि त्यानंतर रांचीतील सभेमध्ये सहभागी होतील, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली.
श्री राहुल गांधी आज सतना और रांची में चुनाव प्रचार के लिए पूरी तरह से तैयार थे, जहां INDIA की रैली हो रही है। लेकिन वह अचानक बीमार हो गए हैं और फिलहाल नई दिल्ली से बाहर नहीं जा सकते हैं। कांग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे जी अवश्य सतना में जनसभा को संबोधित करने के बाद रांची…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) April 21, 2024
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात रांची येथे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीने रविवारी येथे सभेचे आयोजन केले आहे. रांचीतील प्रभात तारा मैदानावर ही सभा होणार आहे. या सबेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राजद नेते तेजस्वी यादव, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित राहतील.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List