तिहार तुरुंगात मधुमेह तज्ज्ञ नाही, केजरीवालांना हळुहळू संपवण्याचं षडयंत्र; ‘आप’च्या आरोपांनी खळबळ

तिहार तुरुंगात मधुमेह तज्ज्ञ नाही, केजरीवालांना हळुहळू संपवण्याचं षडयंत्र; ‘आप’च्या आरोपांनी खळबळ

कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात असून त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवरून तुरुंगाबाहेर गोंधळ उडाला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून सातत्याने केला जात आहे. रविवारी दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकावर हल्ला चढवला.

तिहार तुरुंगाच्या डीजींनी एम्स रुग्णालयाला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी एक मधुमेह तज्ज्ञाची गरज असल्याचे म्हटले आहे. या पत्रामुळे भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाटला आहे. आमच्याकडे विशेष डॉक्टर असून इन्सुलीनही असल्याचे कालपर्यंत तिहार तुरुंग प्रशासन म्हणत होते. मात्र या पत्रामुळे त्यांचे पितळ उघडे पडले आहे, असा आरोप Saurabh Bhardwaj यांनी केला.

Arvind Kejriwal यांना हळुहळू संपवण्याचे षडयंत्र कसे रचले जातेय हे देशच नाही तर आंतरराष्ट्रीय माध्यमंही पाहत आहेत. तिहार तुरुंगामध्ये फक्त एक साधारण डॉक्टर असून तिथे त्याला कोणी नियुक्त केले हे माहिती नाही. मात्र लोकांमध्ये निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना इन्सुलीनपासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप भारद्वाज यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना 20 वर्षांपासून मधुमेहाचा त्रास असून गेल्या 12 वर्षापासून ते इन्सुलीन घेतात. दररोज 50 युनिट इन्सुलीन ते घेताल आणि त्यामुळे त्यांचा मधुमेह नियंत्रणात राहतो. सध्या ते तुरुंगात असून त्यांना इन्सुलीनची गरज आहे, मात्र ते दिले जात नाही.

तिहार तुरुंग प्रशासनाने जारी केलेला रिपोर्ट हा खोटारडेपणाचा कळस आहे. रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी ते कधीही तपासणी करत आहेत. जेव्हा सारखेची पातळी कमी दिसते त्याचीच नोंद अहवालात केली जात आहे. अशा प्रकारे केजरीवाल यांच्या हत्येचे षडयंत्र सुरू असल्याचे भारद्वाज म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;