ग्रॅमी विजेती गायिका मंडिसाचे निधन
अमेरिकन आयडॉल सीझन-5 फेम आणि ग्रॅमी विजेती गायिका मंडिसाचा आकस्मिकरित्या मृत्यू झाला आहे. तिच्या निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मंडिसाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या मृत्यूची दुःखद माहिती देण्यात आली आहे. 47 वर्षीय मंडिसाचा मृतदेह तिच्या घरात सापडला असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मंडिसाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या पोस्टला खूप साऱया यूजर्सने कमेंट करून मंडिसाला श्रद्धांजली वाहिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List