एव्हरेस्ट मसाल्यात कीटकनाशके!

एव्हरेस्ट मसाल्यात कीटकनाशके!

सिंगापूरने हिंदुस्थानातून आयात केलेला एव्हरेस्टचा फिश करी मसाला बाजारातून मागे घेण्याची घोषणा केली. यामुळे हिंदुस्थानातील एव्हरेस्ट मसाला वापरणाऱया ग्राहकांना मोठा धक्का बसला. मसाल्यामध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याचे सांगत हा निर्णय घेण्यात आला. या कीटकनाशकाचा वापर सूक्ष्मजीवांचे प्रदूषण कमी करण्यासाठी व कृषी उत्पादनांवर फवारणी करण्यासाठी केला जातो. मात्र त्याचा खाद्यपदार्थांमध्ये वापर करण्यास बंदी आहे. ते मानवी आरोग्यासाठी योग्य नाही, असे सिंगापूर फूड एजन्सीने म्हटले आहे.

सिंगापूर फूड एजन्सी (एसएफए) ने आयातदार एसपी मुथिया ऍण्ड सन्स यांना परत मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. हिंदुस्थानी कंपनी एव्हरेस्टची उत्पादने 80 हून अधिक देशांना पुरवली जातात. मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणामध्ये इथिलीन ऑक्साईडचा वापर करण्यास परवानगी नाही. इथिलीन ऑक्साईडचा वापर कृषी उत्पादनांमध्ये सूक्ष्मजीव दूषित होण्यापासून रोखण्यासाठी केला जातो. सिंगापूरच्या अन्न नियमांनुसार मसाल्यांच्या निर्जंतुकीकरणामध्ये इथिलीन ऑक्साईड वापरण्याची परवानगी आहे.

ज्या ग्राहकांनी प्रभावित उत्पादने खरेदी केली आहेत, त्यांनी त्यांचा वापर करू नये, असा सल्ला सिंगापूर फूड एजन्सीने दिला आहे. याव्यतिरिक्त ज्या लोकांनी प्रभावित उत्पादनांचे सेवन केले आहे, त्यांनीही वैद्यकीय मार्गदर्शन घ्यावे, असे म्हटले आहे. फिश करी मसाल्यामध्ये मिरची, धणे, चिंच, जिरे आणि लसूण यांसारख्या गोष्टींचा वापर केला जातो. एव्हरेस्ट फिश करी मसाला विविध प्रकारचे ताजे पाणी आणि समुद्राच्या पाण्यातील माशांच्या पाककृती तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

कंपनी चौकशी करणार

विओनच्या अहवालानुसार, कंपनीने एक निवेदन दिले आहे की, एव्हरेस्ट हा 50 वर्षे जुना नामांकित ब्रँड आहे. आमची सर्व उत्पादने चाचणीनंतरच तयार केली जातात. आमच्या उत्पादनांची भारतीय मसाला मंडळाकडून चाचणी घेतली जाते. सध्या आम्ही अधिकृत माहितीची वाट पाहत आहोत. आमची टीम या प्रकरणाची सखोल चौकशी करेल, असे कंपनीने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;