स्मशानाची भिंत कोसळल्याने लहान मुलीसह चार जणांचा मृत्यू
हरियाणातील गुरुग्राममधील मदनपुरी येथे स्मशानभूमीच्या मागे असलेल्या गेटची भिंत अचानक कोसळली. ढिगाऱ्याखाली आल्याने एका लहान मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान घटना घडली. एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. भिंतीच्या एका बाजूला काही लोक खुर्चीवर बसले होते. अचानक भिंत कोसळ्याने ते ढिगाऱ्याखाली अडकले. भिंत पडणार असल्याचे जाणवताच त्यांनी खुर्ची उचलून पळण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पळू शकले नाही आणि दुर्दैवाने त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले.
#WATCH | Haryana: Four people, including a child, died when the walls of a crematorium collapsed on them in Arjun Nagar, Gurugram today. Their postmortem is being done. Police investigation is underway and further action will be taken. pic.twitter.com/5ezomHRd3K
— ANI (@ANI) April 20, 2024
यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही मंडळींनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले. उपचारा दरम्यान पप्पू, कृष्णा, मनोज आणि लहान मुलगी खुशबू यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे पथक आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List