जालन्यातील मोतीबाग तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू
जालना शहारातील मोदीबाग तलावामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मोहम्मद नजीर पठाण (वय – 12) आणि शेख अरफात शेख अखिल (वय – 11) अशी मृत मुलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 4 वाजल्यापासून दोन्ही मुले बेपत्ता होती. कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. अखेर संशय आल्याने कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी मोतीबाग तलावाकडे धाव घेतली असता तिथे मुलांची चप्पल आणि कपडे आढळले. त्यानंतर अधिक शोध घेतल्यावर दोन्ही मुलांचे मृतदेह हातील लागले.
रात्री दहाच्या सुमारास नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक शोएब खान यांनी शहरातील शेख चांद पाशा यांना बोलावून दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा रीतसर पंचनामा केला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List