यूजीसी नेट परीक्षेत मोठे बदल; बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांनाही देता येणार परीक्षा

यूजीसी नेट परीक्षेत मोठे बदल; बॅचलर डिग्रीच्या विद्यार्थ्यांनाही देता येणार परीक्षा

 जे उमेदवार चार वर्षांच्या किंवा आठ सेमिस्टरच्या बॅचलर डिग्री प्रोग्रॅमच्या अंतिम सत्रात शिकत आहेत त्यांनादेखील यूजीसी नेट जून सत्रासाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे या उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या विषयात पीएचडी करता येणार आहे. त्यांनी कोणत्या अभ्यासक्रमातून पदवी घेतली आहे, हे पीएचडीसाठी महत्त्वाचे असणार नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

20 एप्रिल म्हणजे आजपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ल्gम्हू.हू.aम्.ग्ह वर भेट देऊन अर्ज करू शकतील. या वर्षी लागू होणाऱया परीक्षेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. चार वर्षांचा बॅचलर डिग्री प्रोग्रॅम करत असलेले विद्यार्थी त्यांना ज्या विषयात चार वर्षांची बॅचलर पदवी मिळाली आहे ते त्या विषयात पीएचडी करू शकतात. याशिवाय उमेदवार परीक्षेशी संबंधित अपडेट्ससाठी एनटीएच्या https://exams.nta.ac.in/ या नवीन वेबसाईटलाही भेट देऊ शकतात, अशी माहिती जगदीश कुमार यांनी दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;