गुकेश-अलिरेझा यांच्यात निर्णायक लढत महत्त्वाची

टोरँटो/ वृत्तसंस्था

येथे सुरू असलेल्या विश्व बुद्धिबळ फेडरेशनच्या कँडिडेटस् आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा नवोदित ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि फ्रान्सचा ग्रँडमास्टर फिरोज अलिरेझा यांच्यात उपांत्य फेरीची लढत महत्त्वाची ठरणार आहे.

2024 च्या कालावधीतील कँडिडेटस् आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. भारतीय गँडमास्टर गुकेश हा या आगामी फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या अलिरेझावर मात केली तर त्याला या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याची संधी आहे. गुकेशने 7.5 गुण मिळविले असून तो अमेरिकेचा नाकामुरा आणि रशियाचा इयान निपोमेनाची यांच्या समवेत संयुक्त आघाडीवर आहे. या स्पर्धेतील आता दोन फेऱ्या बाकी आहेत. या स्पर्धेतील आगामी फेरीमध्ये नाकामुरा आणि निपोमेनाची यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेत फॅबियानो केरूनाला ही स्पर्धा जिंकण्याची शक्यता अधिक वर्तविली जात आहे. अमेरिकेच्या केरूनाने या स्पर्धेत आतापर्यंत 7 गुण मिळविले असून त्याचा पुढील फेरीतील सामना भारताच्या आर. प्रज्ञानंदबरोबर होणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;