उत्तेजक चाचणीतून शालू चौधरी दोषमुक्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची महिला धावपटू शालू चौधरीवर उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याच्या कारणावरून यापूर्वी 4 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान तिच्या उत्तेजक चाचणीसाठी घेण्यात आलेल्या मूत्रल नमुन्याची डीएनए चाचणी घेतल्यानंतर ते दूषित असल्याचे आढळल्याने तिच्यावर घालण्यात आलेली बंदी तातडीने उठविण्यात आली. आता 30 वर्षीय शालू चौधरी उत्तेजक चाचणीतून दोषमुक्त झाली आहे.

शालू चौधरीची डीएनए चाचणी घेण्यात आली. त्यावेळी या चाचणीमध्ये तिच्याकडून घेण्यात आलेले मूत्रल नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले. शालू चौधरी ही 800 मी. धावण्याच्या शर्यतीतील राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेती धावपटू आहे. शालू चौधरीने स्टिमूलन आणि पेपटीड हार्मोन्स वाढविण्यासाठी दोन निर्बंध घातलेल्या द्रवांचा वापर केल्याने नाडाने तिच्यावर चार वर्षांची बंदी घातली होती. नाडाच्या शिस्तपालन समितीसमोर तिच्या या प्रकरणाची सुनावणी झाली होती आणि तिच्यावर या पॅनेलने बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. शालू चौधरीने यानंतर डीएनए चाचणीची मागणी केली. या चाचणीसाठी नाडाकडून दीड लाख रुपये घेण्यात आले होते. डीएनए चाचणीसाठी लवादाच्या निर्णयानंतर 10 दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत तिची डीएनए चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ती निर्दोष असल्याचा निर्णय 18 एप्रिल रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. आता तिच्याकडून घेण्यात आलेली दीड लाख रुपयांची रक्कम नाडाला परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी शालू चौधरीला न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;