पाक-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द

वृत्तसंस्था/ रावळपिंडी

न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सध्या पाकच्या दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. दरम्यान या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी आयोजित केला होता पण मुसळधार पावसामुळे हा सामना पूर्णपणे वाया गेला.

या सामन्याला प्रारंभ होण्यापूर्वी पावसाने अडथळा आणला होता. त्यामुळे पंचांनी खेळ सुरू केला नाही. काही वेळ पाऊस थांबल्यानंतर पंचांनी हा सामना प्रत्येकी पाच षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक केल्यानंतर पाकने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. पाकचा वेगवाग गोलंदाज शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज टीम रॉबिनसनला खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचित केले. केवळ दोन चेंडू टाकल्यानंतर पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने हा सामना पंचांनी रद्द केल्याचे जाहीर केले. न्यूझीलंडची स्थिती 1 बाद 2 अशी होती. आता उभय संघातील दुसरा टी-20 सामना शनिवारी खेळवला जाणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी पीसीबीने अष्टपैलू इमाद वासीम आणि आमीर यांना पुन्हा संघात स्थान दिले आहे. आमीर आणि अष्टपैलू वासीम यांनी यापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. आता ते येत्या जून महिन्यात विंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार असल्याचे पीसीबीला कळविले आहे. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना रावळपिंडीत खेळवला जाणार असून शेवटचे दोन सामने 25 आणि 27 एप्रिलला लाहोरमध्ये होतील.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;