प्रसार भारती की प्रचार भारती! डीडी न्यूजचा भगवा रंग वादात
‘डीडी न्यूज’ या सरकारी वाहिनीच्या लोगोचा रंग बदलल्यामुळे राजकारण तापले आहे. पूर्वी असलेला लाल रंगाचा लोगो आता भगवा करण्यात आला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा बदल करण्यात आल्यामुळे विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला.
लोगोचा रंग बदलल्याची माहिती देताना ‘डीडी न्यूज’ने ‘एक्स’वर व्हिडीओ पोस्ट करत म्हटलेय, ‘आमची मूल्ये समान राहिली तरी आम्ही आता एका नवीन अवतारात समोर येत आहोत. वेगापेक्षा अचूकता, दाव्यांपेक्षा तथ्य आणि सनसनाटीपेक्षा सत्य… तुम्ही एका अशा वृत्त प्रवासासाठी सज्ज व्हा, जो यापूर्वी कधीही अनुभवला नसेल. नवीन डीडी न्यूजचा अनुभव घ्या. डीडी न्यूज-ट्रस्ट सच का.’
दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी म्हणाले, जी-20 समिटपूर्वी आम्ही ‘डीडी इंडिया’मध्येदेखील सुधारणा केल्या होत्या. आता आम्ही दृश्य आणि तांत्रिकदृष्टय़ा ‘डीडी न्यूज’च्या पुनरुज्जीवनावरदेखील काम करत आहोत. त्याचाच भाग म्हणून लोगोचा रंग बदलला आहे. या आधी निळा, पिवळा, लाल असे रंगही वापरण्यात आले आहेत.
ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी दूरदर्शनने आपला ऐतिहासिक फ्लॅगशिप लोगो भगव्या रंगात रंगवला हे पाहून वाईट वाटते. माजी सीईओ म्हणून मी त्याचे भगवीकरण चिंतेने पाहतोय. ती आता ‘प्रसार भारती’ नाही तर ‘प्रचार भारती’ आहे, हे मला जाणवतेय, अशी टीका टीएमसीचे खासदार आणि प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांनी केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List