बुलढाणा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झंझावात

बुलढाणा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झंझावात

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी रविवारी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते मुकुल वासनिक हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत.

बुलढाणा मतदारसंघातील प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून येथे 26 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. गद्दार विरुद्ध निष्ठावान अशी लढत येथे होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी रविवार, 21 एप्रिल रोजी खामगाव येथील जे. व्ही. मेहता विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांची जाहीर सभा होणार आहे.

महाविकास आघाडीच्या या सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार रेखा खेडेकर, कार्याध्यक्ष नरेश शेळके आणि प्रसन्नजित पाटील आदींनी केले आहे.

उद्धव ठाकरे, शरद पवार, मुकुल वासनिक यांची सभा
स्थळ : जे. व्ही. मेहता विद्यालयाचे मैदान, खामगाव
वेळ : सायंकाळी 5 वाजता

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;