मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही! पंकजा मुंडे यांचा खुलासा

मी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली नाही! पंकजा मुंडे यांचा खुलासा

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर आपण कोणतीही टीका केली नाही, असा स्पष्ट खुलासा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला आहे. मी गोपीनाथ मुंडे यांची वारसदार आहे, शब्द मागे घेत नाही, असेही त्या म्हणाल्या.

आष्टी, पाटोदा परिसरात एका जाहीर सभेत बोलताना भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मराठा आंदोलन, मनोज जरांगे पाटील यांचा नामोल्लेख न करता कितीही आमरण उपोषण केले, भाषणे ठोकली तरी कायदा बदलत नाही, अशी टीका केली होती. यावरून वादळ उठताच त्यांनी घलमजाव करत मी असे बोललेच नाही मी वेगळ्या विषयावर बोलत होते. परंतु आपल्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला असे त्या म्हणाल्या. मी गोपीनाथ मुंडे यांची वारसदार आहे. मला बोलायचे असेल तर मी थेट बोलेन, आडपडदा ठेवून बोलणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही, असेही त्या म्हणाल्या.

माझ्या वाटेला येऊ नका! मनोज जरांगे यांचा इशारा
पंकजा मुंडे यांनी केलेले विधान मी ऐकले नाही. त्यांना मी कधीही विरोधक मानले नाही. पण त्यांना याच वाटेला यायचे असेल तर मराठ्यांचाही नाईलाज होईल. मी तुमच्या वाटेला आलो नाही, तुम्ही माझ्या वाटेला येऊ नका, अशा स्पष्ट शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांना सुनावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;